Home औरंगाबाद ‘श्रावस्ती बुद्ध विहार’ येथे ‘श्रामनेर’ शिबिराची सांगता…!

‘श्रावस्ती बुद्ध विहार’ येथे ‘श्रामनेर’ शिबिराची सांगता…!

1669
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने १० दिवशीय श्रामणेर /श्रामणेरी शिबिर श्रावस्ती बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले होते, लहान थोर काषायवस्त्रधारी भिक्खु संघाने गजबजलेला हा सोहळा ‘बुद्धं सरणं गच्छामी’ या स्वराने वातावरणात १० दिवस निनादला.

६ डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या ‘महाप्रयाण’ दिनी शिबिराचा समारोप संपुर्ण औरंगाबाद येथील भिक्खु संघ व पुज्य भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो यांच्या उपस्थितीत झाला.

२७ नोव्हेंबर रोजी पुज्य भिक्खु आनंदबोधी महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहा दिवसीय श्रामणेर शिबिरास प्रारंभ झाला होता. राज्यभरातील विविध कुळातील लहानथोरांनी ‘श्रामणेर’ दीक्षा घेऊन भगवान बुद्धांचा धम्म अनुसरण्याचा निर्धार केला. पुज्य भिक्खु ग्यानरक्षित थेरो यांच्यासह पुज्य भिक्खु संघाने बुद्ध,धम्म आणि संघ विषयी मार्गदर्शन केले.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर टाकलेले हे एक आश्वासक पाऊल आहे. शहरातील बौद्ध उपासक उपसिकांनी श्रावस्ती विहार, साकेत नगर, भीम नगर भावसिंग पुरा येथे बुद्ध वंदना, धम्मदेसना, सामूहिक ध्यानसाधना, प्रवचन अशा विविध कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

६ डिसेंबर ला बाबासाहेबांच्या ‘महाप्रयाण दिनी’ सामूहिक ध्यानसाधना, महापरित्राणपाठ, धम्मदेसना, कॅण्डल धम्म रॅली व भिक्खु संघास दान अशी या कार्यक्रमाची रुपरेषा होती.

मुख्य म्हणजे कोविड-19 च्या नियमांचे पालन करत हा पुण्यमय कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here