Home महाराष्ट्र राज ठाकरें विरुद्ध तक्रार…

राज ठाकरें विरुद्ध तक्रार…

94
0


मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मराठीवरून मनसे आणि Amazon कंपनीमध्ये निर्माण झालेला संघर्ष समाप्त झाल्यानंतर आता न्यायालयातील लढाईलाही पूर्णविराम देण्याचा निर्णय Amazonने घेतला आहे. त्यामुळे, अखेर हा मनसे-Amazon वाद संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाआणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात आता कोणतीही तक्रार नसल्याचे Amazonचे म्हणणं असून १२ जानेवारी रोजी कोर्टात या अर्जावर पुढची सुनावणी होणार आहे.


मनसेला रोखण्यासाठी Amazonने थेट कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर Amazonने एक पाऊल मागे घेतलं आणि रस्त्यावरचा संघर्ष थांबलाच शिवाय आता कोर्टातील लढाईलाही पूर्णविराम दिला आहे.महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर Amazon आता मराठी भाषा बोलू लागणार आहे. अमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मनसेच्या या भूमिकेची Amazon संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतलीय. Amazon.in या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्या अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. काही दिवसातच ही मागणी मान्य करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात तुम्हाला अमेझॉन मराठीतून दिसणार आहे. Amazonला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसेचे अखिल चित्रे यांनी ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘Amazon.in’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिलाय. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. Amazon अ‍ॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला,त्याबदल दिलगिरी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here