Home बीड अमृत अटलच्या पहिल्या टप्यातील पाणी पुरवठ्याचा प्रारंभ

अमृत अटलच्या पहिल्या टप्यातील पाणी पुरवठ्याचा प्रारंभ

5
0

बीड: अमृत अटल योजने अंतर्गत वार्ड क्रमांक ११ मध्ये पाण्याची टेस्टिंग करण्यात आली. झोन क्र.१३ मध्ये १५०० घरांसाठी नळ जोडणी करण्यात आली. या भागात १३ कि.मी. पाईप लाईन टाकण्यात आली आहे.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते वॉल्ट फिरवून अमृत अटल योजने अंतर्गत केलेल्या पाईप लाईन ची आज पाणी सोडून टेस्टिंग करण्यात आली.

यावेळी नळाला आलेले पाणी पाहून स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त करत मोटर न लागता पाण्याचा वेग पाहून स्थानिकांनी आनंद व्यक्त करत नगराध्यक्षांचे आभार मानले.

यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, नवीन पाईप लाईन टाकण्याच्या अगोदर पाणी पुरवठा करत असताना अधिक वेळ लागत होता. मात्र आता बीड शहराला अमृत अटल योजने अंतर्गत केलेल्या नवीन पाईप लाईन मुळे चार- पाच दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येईल. १२२ कोटी रुपयांची नवीन अमृत अटल योजना मंजूर करून आणली आहे. त्याचा पहिला टप्पा या वार्ड क्रं.११ भक्ती कन्स्ट्रक्शन मध्ये सुरू केला आहे. विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन विकास कामे अडवली जात असल्यामुळे विकास कामे होत नसल्याचे देखील सांगितले.

नगराध्यक्षांनी विरोधकांना देखील आव्हान केले की, स्वतः च्या माध्यमातून बीड शहराच्या विकासासाठी मोठं मोठे प्रकल्प आणावेत.

बीड शहरातील कामे दर्जेदार होत असल्यामुळे बीड नगर पालिकेला राज्य शासन फंड देत आहेत. अर्धवट राहिलेले कामे आठ- दहा दिवसांत सुरू होणार असल्याचे देखील यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे,माजी नगरसेवक सुभाष सपकाळ, शिवसेना नेते राजेश पिंगळे, मुकुंद भालेकर, बाबा पांढरे, रिपाइं जिल्हाध्यक्ष माणिक वाघमारे, ज्येष्ठ नेते नारायण हिंगे, गणेश देशमुख, गणेश परदेशी, शिवाजी कुलकर्णी, अतुल नवले, पिंटू डोळस, दत्ता साठे, कचरू तुपे, सुनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here