Marathwada Sathi

ऑनलाईन मध्ये 7/12 वरील कमी झालेले क्षेत्राची दुरुस्ती करण्यास जिल्हाधिकारी यांची टाळाटाळ – ॲड.अविनाश गंडले

बीड
कचरु केरबा धन्वे रा. कारेगव्हाण ता.जि.बीड यांनी दिनांक 18/08/1988 रोजी मौजे – कारेगव्हाण येथील गट क.196 मधील 80 आर. जमीन किसन, रामभाऊ, चंद्रसेन, पोपट पि. भागोजी खदारे यांच्याकडून खरेदीखत क्र.2545/98 नुसार खरेदी घेतली होती. संपुर्ण 2 एकर जमीनीचे क्षेत्र आज सुध्दा कचरु केरबा धन्वये यांच्या मालकी व वहीतीमध्ये आहे. परंतु महाराष्ट्र शानाने दिलेल्या आदेशानुसार सर्व 712 ऑनलाईन कराव्यात तेव्हा महसुल कर्मचारी व अधिकारी यांनी काही लोकांचे 7/12 वरिल क्षेत्र हे कमी दाखवलेले आहे व काही लोकांची जमीन वहिती असतांना ती जमीन पोटखराब मध्ये दाखवलेली आहे. हा सर्व गोंधळ 7/12 ऑनलाईन करतेवेळी झालेला आहे व अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

याबाबत कचरू केरबा धन्वे यांनी ॲड.अविनाश पं.गंडले यांच्या मार्फत मा.जिल्हाधिकारी बीड, मा.तहसीलदार कार्यालय बीड, मा.तलाठी, तलाठी सज्जा कळसंबर यांना कयदेशीर नोटीस पाठवुन 712 वरिल ऑनलाईन मुळे कमी झालेले क्षेत्र हे दुरुस्त करणे नोटीस दिलेली आहे. तरी सुष्दा महसुल अधिकारीव कर्मचार्याकडुन कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच कलम 155 महाराष्ट्र जमहीन महसुल अधिनियम 1956 नुसार मा.तहसिलदार यांच्याकडे प्रकरण दाखल केलेले आहे. तरीसुध्दा कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

जर मा.जिल्हाधिकारी व कर्मचारी बीड यांनी जर 8 दिवसांत ऑनलाईन मध्ये 7/12 वरिल जमीन दुरुस्ती केली नाही किंवा जमीन वहिती असतांना पोटखराब मध्ये टाकलेली जमीन वहीती रकान्यात आणली नाही तर मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे व तसेच मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे याचिका दाखल केली जाईल.

Exit mobile version