Marathwada Sathi

जिल्ह्यातील नागरिकांनी पाच रुपयांची नोट केली चलनातून बाद

बीड : जुनी पाच रुपयाची नोट सध्या चलनात सुरू असताना बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मात्र ही पाच रुपयाची नोट परस्परच चलनातून बाद केली असून बाजारपेठेत ही नोट व्यापाऱ्यांकडून घेतली जात नसल्याने ज्यांच्याकडे या या पाच रुपयांच्या नोटा आहेत त्यांच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्यातील जनता कधी कोणाला राजकारणातून बाद करेल हे सांगता येत नाही. असे सर्वत्र बोलले जाते. मात्र आता बीड जिल्ह्यातील जनतेने चलनात असलेल्या नोटा आणि नाणी बाद करण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यात सर्वत्र १० रुपयाचे नाणे चलनात वापरले जात असताना देखील बीड जिल्ह्यातील जनतेने काही दिवसांपूर्वीच हे नाणे चलनातून बाद ठरवत. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हे नाणे बंद असल्याचे घोषित केले. त्यामुळे बीड जिल्ह्यात १० रुपयाचे नाणे व्यवहारातून नामशेष झाले आहे. आता पाच रुपयांची नोट देखील जिल्ह्यातील जनतेने चलनातून बाद केले असून कोणीही ही पाच रुपयाची नोट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारत देशवासियांसाठी तयार करण्यात आलेले चलनातील नाणी आणि नोटा बाद करण्याचा अधिकार बीड जिल्ह्यातील नागरिकांना कोणी दिला? हा संशोधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Exit mobile version