Home औरंगाबाद बालसदनतर्फे दिवाळीनिमित्त मिठाई विक्री

बालसदनतर्फे दिवाळीनिमित्त मिठाई विक्री

444
0

औरंगाबाद : दिवाळी निमित्त प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी ही मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मेन संचलीत बालसदनतर्फे या वर्षी पण दिवाळी फराळ विक्री केंद्र सुरू केले आहे.या विक्रीतून येणारा पैसा बालसदनच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. यावर्षी ‘लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मेन’‘लायनेस क्लब’ तर्फे संयुक्त रित्या हा प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे.


यासाठी ‘सुंदर टी कंपनी,जाधवमंडी’‘लायन्स बालसदन कंपाउंड,उस्मानपुरा‘ अशी दोन विक्रीकेंद्रे उभारण्यात आली आहे .सर्वांनी यासाठी सहकार्य करावे,दिवाळीचा फराळ आमच्याकडून खरेदी करून या चांगल्या सामाजिक कार्यात नागरिकांनी मदत करावी असे आवाहन प्रोजेक्ट पर्सन ला. अशोक रूणवाल,ला.तनसुखजी झांबड अध्यक्ष ला.उषा नागपाल,ला.माधुरी चौधरी,ला.विमला हब्बू व लायनेस लता रूणवाल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here