Marathwada Sathi

अंबानी यांना ‘पुत्ररत्न’…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेल्या अंबानी कुटुंबात एका लहान पाहुण्याचे आगमन झाले आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याला पुत्ररत्न झाले आहे.आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांनी आज सकाळी ११ वाजता गोंडस बाळाला जन्म दिला आहे.आकाश आणि श्लोका हे ९ मार्च २०१९ रोजी विवाहबंधनात अडकले होते.नव्या चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान,अंबानी कुटुंबाच्या वतीने एका प्रवक्त्यांनी याविषयी अधिक माहिती देत सांगितले की, “भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने नीता अंबानी आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा झाल्यामुळे आनंदी आहेत. आई आणि मुलगा दोघांचीही प्रकृती चांगली असून चिमुकला पाहुणा कुटुंबासाठी आनंदाची बहार घेऊन आला आहे.”

Exit mobile version