Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची “विदर्भवारी ” गोसीखुर्द प्रकल्पाला भेट

मुख्यमंत्र्यांची “विदर्भवारी ” गोसीखुर्द प्रकल्पाला भेट

221
0

चंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्यादौऱ्यावर आहेत.यादरम्यान त्यांनी आज वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिली. कामाची पाहणी करत काम मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.मुख्यमंत्र्यांनी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आढावा घेऊन निधी तसेच भूसंपादनासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पाच्या अपूर्ण राहिलेल्या भूसंपादनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. येथून निघत असतानाच शेतकरीआणि प्रकल्पग्रस्तानी त्यांना अडविले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे स्वत: गाडीतून खाली उतरले आणि प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. गेली 35 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. हजारो कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्याने पोलीस आणि प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here