Marathwada Sathi

छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : गँगस्टर छोटा राजनसह जणांना चक्क २६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

२०१५ चे प्रकरण

सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सांगितले की,पनवेल येथील नंदू वाजेकर(बिल्डर)यांनी पुण्यात एक जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतली होती. ही जागा वाजेकर याला परमानंद ठक्कर या एजंट ने दिली.जागेच्या बदल्यात वाजेकर याने परमानंद याला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, यानंतर आपला व्यवहार पूर्ण झाला नसल्याचं कारण पुढे करत परमानंद याने पैसे मागायला सुरुवात केली होती. जास्त पैसे मिळावे म्हणून परमानंद ठक्कर याने या व्यवहारात गँगस्टर छोटा राजन याला मध्यस्थी करायला सांगितली होती.त्यानंतर छोटा राजनने वाजेकर ला धमकावले. यामुळे वाजेकर याने घाबरून पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान,छोटा राजन सोबत सुरेश शिंदे, सुमित म्हात्रे आणि अशोक निकम यांनाही दोन वर्षे शिक्षा आणि ५ हजार रु.दंड अशी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version