Marathwada Sathi

पाऊस पडण्याची शक्यता…!

मराठवाडा साथी न्यूज
मुंबई :
राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यावेळी पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली आहे.
५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.राज्यात ५ ते ११ फेब्रुवारी दरम्यान, कोकणात पावसाळी वातावरण असेल. या पावसाळी वातावरणामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

Exit mobile version