Home बीड चैन चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चैन चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

349
0

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मराठवाडा साथी न्युज

बीड : नाशिक येथे एकनाथ खडसे यांच्या दौर्‍यात एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील १२७ तोळ्याची चैन लंपास करणार्‍या आरोपीच्या बीडमधून स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत आणि एपीआय विजय गोसावी यांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १२७ ग्रॅमची चैन हस्तगत केली असून आरोपीला चांदवड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. 
   याबाबत अधिक माहिती अशी की २४ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता एकनाथ खडसे हे मुंबईहून जळगावकडे जात असताना नाशिक येथील चौकात चौफुलीजवळ हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार ठेवला होता. त्यावेळेस प्रसाद आबासाहेब देशमुख यांच्या गळ्यातील १२७ ग्रॅमची चैन आरोपी प्रवीण विजय गायकवाड (वय २४, रा. गांधीनगर बीड) लंपास केली. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात त्याच दिवशी अज्ञात आरोपीविरोधात कलम ३५६, ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय विजय गोसावी, पोलिस नाईक कैलास ठोंबरे, सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, प्रसाद कदम, सतीश कातखडे व चालक वंजारे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील चैन चोराच्या मुसक्या आवळल्या असून त्याला चांदवड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here