Home औरंगाबाद धारदार तलवार बाळगणाऱ्या ….

धारदार तलवार बाळगणाऱ्या ….

315
0


मराठवाडा साठी न्यूज

औरंगाबाद : औरंगाबाद मधील मिसारवाडी भागात धारदार तलावर बाळगुन नागरिकात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी अटक केले . १ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक अशोक गिरी याना गुप्तहेरांकडून मार्फत माहीती मिळाली एक व्यक्ती मिसारवाडी गल्ली नं .०७ मध्ये स्वतःच्या हातात धारदार तलवार घेवून फिरुन स्थानिक नागरीकांत दहशत निर्माण करीत आहे .

पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले .आरोपी दानीश खान अजीज खान , वय १ ९ वर्षे , धंदा- फेब्रीकेशन , रा . गल्ली नं .०७ , मिसारवाडी , उस्मानिया मज्जीदजवळ औरंगाबाद याचेकडे एक धारदार लोखंडी तलवार जप्त करुन आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे . पुढील कारवाई मा . पोलीस आयुक्त , श्री . डॉ.निखील गुप्ता सर , मा . पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ ,दिपक गि – हे सर , सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग निशीकांत भुजबळ सर , सिडको पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गिरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे . सिडकोचे पोलीस उप – निरीक्षक. बाळासाहेब आहेर ,पोलीस अंमलदार दिनेश बन,संतोष मुदीराज,इरफान खान,गणेश नागरे,स्वप्नील रत्नपारखी यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here