Home औरंगाबाद कार, दुचाकीचा अपघात, चार जण गंभीर

कार, दुचाकीचा अपघात, चार जण गंभीर

71
0


मराठवाडा साथी न्यूज
सिल्लोड । कारचालकाचे िनयंत्रय सुटल्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक िदल्याची चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरवार दि. २२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तालुक्यातील माणिकनगर (भवन) येथील गणपती सॉ मिल जवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोडहुन आळंदकडे जाणारी कार क्रमांक एम एच २० डी व्ही ६८१२ माणिक नगर (भवन) येथील गणपती सॉ मिल जवळ येताच कारचालकाचा कारवरील अचानक ताबा सुटल्याने कारने समोर येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम. एच. ई. यू २२७३ ला जोरदार धडक देत विरुद्ध दिशेला असलेल्या विद्युत रोहित्रावर जाऊन धडकली.या अपघातात कारचालक विठ्ठल मुरलीधर दगडघाटे (४६) आणि सोबत असलेला रवींद्र लक्ष्मण अंभोरे (२०) दोघेही राहणार चारणेर (ता.सिल्लोड) दुचाकीवरील आनंद गणपत फुके (२०) रा.धानोरा (सिल्लोड) आणि संतोष सुखदेव पवार (२५) रा तलवाडा हे जखमी झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनी किरण बिडवे हे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातातील संतोष पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सदरील अपघातप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर रोहित्रावर धडकण्याची हॅटट्रिक
अपघात घडलेल्या ठिकाणी सिल्लोड – औरंगाबाद हा उतारावरील रस्ता असून रस्त्याच्या कडेला वीस फुटावर असलेल्या या रोहित्रावर आतापर्यंत तिसऱ्यांदा वाहन धडकण्याची घटना घडली आहे. मात्र, स्पार्किंग किंवा वीज प्रवाह उतरण्याची घटना घडली नसल्याने प्रत्येक वेळी मोठी हानी टळली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here