Marathwada Sathi

फसवणुकीच्या प्रकरणात कार डिझायनर दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने कार डिझायनर दिलीप छाब्रियाची बहिण कंचनला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. कंचन ही ‘दिलीप छाब्रिया डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची सीईओ आहे.कॉमेडियन कपिल शर्माने दिलीप छाब्रिया आणि त्याच्या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कपिलने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,२०१७ मध्ये मी दिलीप छाब्रियाच्या कंपनीला एक व्हॅनिटी व्हॅन डिझाईन करण्यासाठी ५.७ कोटी रुपये दिले होते. परंतु अजूनही ही व्हॅनिटी अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणात कंपनीसाठी सीनियर सेल्स एक्झिक्युटिव्हचं काम करणाऱ्या निहाल बजाजला ही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान,मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने कंचनला बुधवारी(२७ जाने.)एक रेस्टॉरंटमधून अटक केले आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की,कंचन अटकेपासून वाचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.अखेर पोलिसांनी तिचं लोकेशन शोधून तिला मरिन ड्राईव्हजवळच्या एका रेस्टॉरंटमधून अटक केली आहे.तिला आणि निहाल बजाज यांना आज कोर्टात हजर करण्यात येईल.

Exit mobile version