Home क्राइम बीड मध्ये सापडली ‘गांजाची’ शेती…!

बीड मध्ये सापडली ‘गांजाची’ शेती…!

506
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड : आज(१७ डिसें.)स्थानिक गुन्हे शाखेने बीड तालुक्यातील मासापूर तांडा परिसरात शेतामध्ये गांजाची ६३ झाडे लावली असल्याचे उघडकीस आणले आहे. याप्रकरणी राजाराम दशरथ लांडे(वय ५५)यांच्या विरोधात पिंपळनेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या ६३ झाडांचे वजन सुमारे २ किलो असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगूणे,संजय जायभाये,बालाजी दराडे,काळे बागवान,राहुल शिंदे यांनी केली.

दरम्यान,आष्टी तालुक्यातील कारखेल येथे घराशेजारील शेतात गांजाची १६ झाडे मंगळवारी अंभोरा पोलिसांनी जप्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here