Marathwada Sathi

आता अमिताभ बच्चन ऐवजी “या ” महिलेची वाजणार कॉलर ट्यून !

मुंबई : काहीदिवसांपूर्वीच एका चाहत्याने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोनाची कॉलर ट्यून बंद करण्यात यावी अशी मागणी केली होती. तर आजपासून मोबाईलवर अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ट्यून ऐकू येणार नाही. आपल्या मोबाईलची डीफॉल्ट कॉलर ट्यून आता बदलणार आहे. शुक्रवारपासून बिग बींची कॉलर ट्यून ऐकायला येणार नाही. आजपासून जेव्हा आपण एखाद्याला कॉल कराल तेव्हा आपल्याला कोरोना लसीकरणाशी संबंधित कॉलर ट्यून ऐकू येईल. नवीन कॉलर ट्यून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असेल आणि जसलीन भल्लाच्या आवाजात ती असणार आहे.

गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन दरम्यान जसलीन भल्ला अचानक चर्चेत आली. संपूर्ण देशात कॉलरट्यून म्हणून जसलीनच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या ‘कोरोना व्हायरस किंवा कोविड -१९’ च्या विरोधात संपूर्ण देश लढत आहे. परंतु लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचा आहे, रोग्याशी नाही.’जसलीन भल्ला ही एक सुप्रसिद्ध व्हॉईस ओव्हर कलाकार आहे. तिने यापूर्वी कोरोनाशी संबंधित कॉलर ट्यूनला आवाज दिला होता. गेल्या दशकभरापासून ती व्हॉईस-ओव्हर कलाकार म्हणून काम करत आहे, तिचा आवाज आपण दिल्ली मेट्रो, स्पाईस जेट आणि इंडिगो उड्डाणांमध्येही ऐकला आहे. त्या क्रीडा पत्रकार देखील राहिल्या आहेत.

Exit mobile version