Home बीड केज येथील तरुणीवर पुण्यात बलात्कार

केज येथील तरुणीवर पुण्यात बलात्कार

127
0

केज : केज येथील एक तरुणी ही एका तरूणा सोबत पुणे येथे गेले असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील एक भटक्या जमातीची तरुणी ही तिच्या भावकीतील तरुणा सोबत पुणे येथे पळून गेली होती. त्या ठिकाणी त्यांनी पुणे काळभोर येथे २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत एक खोली मध्ये तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने त्या तरुणाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

या बाबत पीडित तरुणीच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ४८०/ २०२० भा. दं. वि. ३७६ (२) (एन) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान यातील आरोपी पोलिसांनी अटक केली असून त्याला १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here