Home क्राइम रागाच्या भरात ‘जळीतकांड’…!

रागाच्या भरात ‘जळीतकांड’…!

341
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : रागाच्या भरात माणूस काहीही करू शकतो खर आहे.मात्र,एका मित्राने रागात त्याच्या मित्राची गाडी पेटवली पण त्या गाडीमुळे नजीकच्या १० गाड्या देखील जळून खाक झाल्या.ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता.त्यामुळेच एका मित्राने दुसऱ्या मित्राची गाडी पेटवली.मात्र आग पसरत गेल्यामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनी मिळून कॅमेरा विकत घेतला.यासाठी ऋतुराज घोरपडे या तरुणाने त्याच्या वडिलांच्या नावाने कर्ज घेतले होते.विविध कार्यक्रमांच्या ऑर्डर्स घेऊन त्यांनी हे कर्ज फेडण्याचे ठरवले होते.काही ऑर्डर्स मिळाल्या,मात्र त्यानंतर ऑर्डर्स कमी झाल्या त्यामुळे हप्ते थकत गेले.

त्यामुळे ऋतुराजने कॅमेरा विकून टाकला.मात्र तरी तो एका खाजगी कंपनीत कामाला जाणाऱ्या दुसऱ्या मित्राकडे कर्जाचा हफ्ता मागत होता.मात्र तो म्हणाला की,कॅमेरा विकला तरी मग आता मी पैसे का देऊ? यावरून त्या दोघांमध्ये वर्षभरापासून वाद सुरु होते.यामुळे संतापलेल्या ऋतुराजने मध्यरात्री चिंचवडमधील ओम गणेश सोसायटीत येऊन मित्राची गाडी पेटवून तेथून ऋतुराज पसार झाला. दरम्यान,सोसायटीतील सीसीटीव्ही फोटेज तपासल्यानंतर वाहनांच्या जळीतकांचे सत्य समोर आले आणि त्यानुसार चिंचवड पोलिसांनी ऋतुराजला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here