Home मनोरंजन ‘बंटी और बबली पार्ट 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘बंटी और बबली पार्ट 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

57
0

मुंबई : कोरोना नंतर देश पूर्ववत होत आहे. यामध्ये अनलॉक च्या पाचव्या टप्प्यात सरकारकडून राज्यात थिएटर्सआणि नाट्यगृहे खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता थिएटर्स उघडल्यानंतर कोणते सिनेमे प्रेक्षकांना बघायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अनेक चित्रपट थिएटर्स मध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.

यामध्ये राणी मुखर्जी आणि सैफ अली खान बहुप्रतिक्षित यांचा ‘बंटी और बबली पार्ट-२’ लवकरच थिएटर्स मध्ये होणार आहे. क्रिसमस मध्ये हा चित्रपट येणार असल्याचे सांगितले जातं आहे. यशराज फिल्म्स चे चेअरमन आणि प्रोड्यूसर आदित्य चोप्रा हे हा चित्रपट क्रिसमस मध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. थेटर्स उघडल्यानंतर निर्मात्यांकडून चित्रपटांचे ट्रेलर रिलीज करण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये २००५ मध्ये आलेली बंटी और बबली या चित्रपटाचा सिक्वल असलेले ‘बंटी और बबली -२’ ही प्रेक्षकांसाठी एक फेस्टिव मूवी असणार आहे.

लॉकडाऊनमध्ये निर्माते आणि बॅनर्स कडून डिजिटल प्लॅटफॉर्म चा आधार घेत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र यशराज फिल्म कडून हा मार्ग अवलंबला गेला नव्हता. यशराज बॅनरचा कोणताही सिनेमा लॉग डाऊन मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला नाही. त्यामुळे ‘बंटी और बबली-२’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.२००५ मध्ये आलेल्या बंटी और बबली या चित्रपटाचे सिक्वेल असलेल्या या सिनेमामध्ये राणी मुखर्जी सैफ अली खान त्यांचा अभिनय प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे तर त्यासोबतच या सिनेमामध्ये वरून वी शर्मा, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे देखील दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here