Marathwada Sathi

प्रियकर-प्रेयसीने चिंचेच्या झाडाला…


मराठवाडा साथी न्यूज
सोलापूर : महाविद्यालयाच्या परिसरात प्रियकर-प्रेयसीने चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात बी. पी. एड. कॉलेज परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. विशेष म्हणजे मयत तरुणी अल्पवयीन होती. तोंडाला बांधायच्या स्कार्फने चिंचेच्या झाडाला गळफास बांधून दोघांनी कॉलेज परिसरातच आयुष्य संपवलं. मयत तरुण १९ वर्षीय असून त्याच्यासोबत आत्महत्या करणारी तरुणी अल्पवयीन होती. प्रेमसंबंधांना विरोध झाल्यामुळे दोघांनी जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे.

Exit mobile version