Home मनोरंजन बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रियाला जामीन मंजूर

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रियाला जामीन मंजूर

78
0

मुंबई । बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. एनसीबीकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचाही जामीन मंजूर झाला आहे. मात्र, रियाचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत न्यायधीश सारंग वी. कोतवाल यांनी निर्णय सुनावला. प्रकरणाच्या सुनावणीनंतर 29 सप्टेंबर रोजी कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी एनडीपीएल कोर्टाने रिया, शौविक, सॅम्युअल, दीपेश, बासित परिहार आणि जैद यांच्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 20 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. एनसीबीने 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला अटक केली होती. 9 सप्टेंबर रोजी मुंबईच्या भायखळा कारागृहात तिची रवानगी करण्यात आली होती. जवळपास 1 महिनाभर रिया चक्रवर्ती भायखळा जेलमध्ये होती.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीदरम्यान ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर एनसीबीच्या टीमने तपास सुरु केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here