Marathwada Sathi

बोल्ड सीन्समुळे ‘पौरषपुर’ चर्चेत…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : काही दिवसांपासून अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या एका खास लूकमुळे चर्चेत आला होता. मिलिंद लवकरच ‘पौरषपुर’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो एक वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणार आहे. या वेब सीरिजचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून बोल्ड सीन्समुळे सोशल मीडियावर ‘पौरषपुर’चर्चेत आला आहे.

पौरषपूर ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. भव्यदिव्य सेट, सत्तेसाठी होणारी लढाई, वासना, रक्ताने लाल झालेल्या तलावारी, प्रभावशाली संवाद, पुरुष आणि महिलांमधील असमानता असे अनेक पैलू या सीरीजमधून उलगडणार असल्याचे दिसत आहे. पौरषपूर या वेब सीरीजचे कथानक पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित आहे.

दरम्यान,या वेब शोमध्ये मिलिंद सोमण बरोबर अभिनेत्री शिल्पा शिंदे, शाहीर शेख, साहिल सलाथिया आणि अन्नू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.याचे दिग्दर्शन सचिंद्र वत्स हे करीत आहेत.

Exit mobile version