Marathwada Sathi

घरात आढळला ‘मृतदेह’…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सदाशिव पेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालयाच्या गल्लीतील एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आज(१२ जाने.)सकाळी सापडल्याने नजीकच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू दिवसांअगोदरच झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.शवविच्छेदनानंतर या महिलेचा खून झाला की अकस्मात मृत्यू हे स्पष्ट होईल.

ब्राह्मण मंगल कार्यालयाच्या या गल्लीमध्ये हॉटेल मराठा कोल्हापूर दरबार असून या हॉटेलच्या वरती एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस तसेच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले.या फ्लॅटमध्ये एक कामगार दाम्पत्य राहत असून मागील दिवसांपासून हा फ्लॅट बंदच होता.मात्र, नंतर मृतदेह कुजल्यामुळे तेथील परिसरात वास येऊ लागला.अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.

दरम्यान,या मृतदेहावर फ्लेक्स टाकण्यात आल्याचे पोलिसांचे निदर्शनात आले. त्यामुळे हा खून असावा,असा पोलिसांना संशय आहे.

Exit mobile version