Home अंबाजोगाई रक्ताचा तुटवडा ; बीड काँग्रेसच्या 650 जणांचा रक्तदानासाठी पुढाकार

रक्ताचा तुटवडा ; बीड काँग्रेसच्या 650 जणांचा रक्तदानासाठी पुढाकार

558
0

अंबाजोगाई
सध्याच्या काळात राज्यभरात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे.राज्यामध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा अतिशय कमी आहे.जनतेने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे असे आवाहन विविध स्तरांमधून करण्यात येत आहे.ही बाब लक्षात घेता काँग्रेस पक्षाने संपुर्ण लॉकडाऊन कालावधीत सुमारे 650 जणांनी वेळोवेळी झालेल्या शिबीरात रक्तदान केले आहे.मंगळवार,दि.22 डिसेंबर रोजी आयोजित जीवनदान महाअभियान उपक्रमातर्गंत 21 जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

जीवनदान महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांच्या आवाहनानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,फ्रंटल ऑर्गनायझेशन,विविध सेलचे प्रमुख,जिल्हाध्यक्ष,तालुका,शहर,ग्रामीण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात आले होते.आपल्या तालुक्यातील प्रत्येक ब्लॉक मध्ये वरील काळात रक्तदान शिबीर आयोजीत करावे व जास्तीत जास्त रक्त संकलीत करून रक्तपेढीला पाठविण्याची व्यवस्था करावी असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले होती.त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अंबाजोगाईत रक्तपेढीचे गरजेनुसार या अभियानांतर्गंत नव्याने 21 जणांनी रक्तदान केले.त्यात स्वतः काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी रक्तदान करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.याबाबत राज्य सरकारचे वतीने नुकतेच कोरोना काळात राज्यातील रूग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंञी ना.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून मंगळवार,दिनांक 22 डिसेंबर रोजी अंबाजोगाईत रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढी विभागात करण्यात आले होते.यावेळी नगरसेवक सुनिल व्यवहारे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,माजी नगरसेवक गणेश मसने,माजी नगरसेवक अनिस मोमीन,दिनेश घोडके, जावेद गवळी,महेबुब गवळी,सचिन जाधव, सहशिक्षक विजय रापतवार आदींची उपस्थिती होती.यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अंबाजोगाई शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,विशाल पोटभरे,शिवय्या बसय्या हिरामण,काजी समियोद्दीन शमशोद्दीन,महेश वेदपाठक,काजी आमेर अझहर,राहुल सोळंके,शेख शरीफ शेख वलीद,राहूल वाघमारे,खंडु वाघमारे,राहुल सरवदे,नदीम शहा खलील शहा,पठाण शहारूख फिरोज खान,मोमीन अजहर मुर्तूजा,शेख अन्वर शेख आबेद,जावेद बागवान,शेख अमजद,निसार बागवान,शेख निजाम रज्जाक आदींसह 21 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सध्या महाविद्यालये बंद आहेत.तसेच रक्तदानात अग्रेसर असणार्‍या बर्‍याच मोठ्या कंपन्या,कॉर्पोरेट हाऊस यांच्या कडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्त संकलनामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. कोरोना विरूद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स,पोलीस, आरोग्य कर्मचारी हे आपले योगदान देत आहेत.या लढाईसाठी आवश्यक औषधे,सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.परंतू,राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील 344 रक्तपेढ्यांमध्ये केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा साठा असल्याची माहिती मिळत आहे.ही बाब चिंतेची आहे.त्यामुळे येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय,धार्मिक,सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या-छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करून रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रूग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे असे आवाहन सन्माननिय मुख्यमंत्री यांनी केले आहे हे स्वागतार्ह आहे.कारण,यापूर्वी बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने संपूर्ण लॉकडाऊन काळात सुमारे 650 हून अधिक जणांनी रक्तदान करून सरकारच्या आवाहनाला वेळोवेळी प्रतिसाद दिला आहे.तसेच काँग्रेस पक्षाने आजपासून म्हणजेच दि.6 डिसेंबर 2020 (महापरिनिर्वाण दिन) पासुन जीवनदान महाअभियान राबविण्याचे ठरविले आहे.या महाअभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवार,दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी अंबाजोगाईत रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. तरी या महाअभियानात काँग्रेस पक्षासहीत महाविकास आघाडीतील सर्व समविचारी पक्ष यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते,सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here