Marathwada Sathi

उद्धवा धन्य आहे तुझे सरकार

मराठवाडा साथी न्यूज

बांबोरी : राज्याचे राज्यमंत्री आणि राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा वांबोरी गावात असलेल्या ‘प्रसाद साखर कारखान्याने’ शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. २०१८ साली साखर कारखान्याने २३२१ रूपये प्रती टन भाव जाहीर केला आणि राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादकांना त्यानुसार पैसेही अदा केले.मात्र, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना केवळ २१०० रूपयांप्रमाणे पैसे दिले गेले. त्यामुळे २०१८ साली गाळप केलेल्या ऊसाचे कोट्यावधी रूपये थकवल्याने शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.

आता प्राजक्त तनपुरे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.ऐन दिवाळीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद साखर कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. २२१ रूपयांप्रमाणे हजारो शेतकऱ्यांचे जवळपास ‘सव्वा दोन कोटी’ रूपये शेतकऱ्यांना घेणे आहे. मात्र, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.गेल्या वर्षी गळीत हंगाम बंद होता यावर्षी मात्र गळीत हंगामाची सुरूवात झाली आहे.

आमचे थकीत पैसे द्या, ही मागणी करत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी काल प्रसाद साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.आमचे पैसे दिले जात नाही तोवर आम्ही उठणार नाही, असा पवित्रा ऊस उत्पादक शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीला कारखानदार तुपाशी आणी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version