Home औरंगाबाद महिला अत्याचाराविरोधात भाजपाचे आंदोलन (व्हीडिओ)

महिला अत्याचाराविरोधात भाजपाचे आंदोलन (व्हीडिओ)

0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व झोपेचे सोंग घेणाऱ्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा औरंगाबादतर्फे सोमवारी (दि.) जिल्हाधिकारी कार्यालय व क्रांती चौक येथे खा. डॉ भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, महिला मोर्चा सरचिटणीस सविताताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना अतुल सावे म्हणाले की, महाराष्ट्रात महिलावर दररोज अत्याचार होत असताना हे सरकार सुस्त कसे राहू शकते? महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना घडू नये हा जरी सामाजिक मुद्दा असला तरी राज्य सरकार म्हणून सरकार त्याची जबाबदारी झटकू शकत नाही. प्रत्येक मुलीची, महिलेची इज्जत तिची अब्रू महत्वाची आहे. परंतु महाराष्ट्रात ज्याप्रकारे महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्याकडे शासन म्हणून कोण बघणार? नुसतंच माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून कसे चालेल. राज्यात महिलावर होणाऱ्या अत्याचाराची पण जबाबदारी घ्यावी लागेल. यावेळी महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सरकारवर आक्रोश व्यक्त केला. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तर महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शासनाकडून लवकरात लवकर पावले उचलण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र महिला मोर्चा उपाध्यक्षा तथा औरंगाबाद प्रभारी प्रणिती चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा माधुरी अदवंत, मनीषा भन्साळी, महिला शहर जिल्हाध्यक्षा अमृता पालोदकर, लता दलाल, विमल केंद्रे, अर्चना नीलकंठ, किर्ती शिंदे, जिप सदस्या अनुराधा चव्हाण, साधना सुरडकर, मनीषा मुंडे, संगीता जाधव, रेखा जैस्वाल, मिसाळ, दिव्या पाटील, उषा काळे, गीता कापुरे, वर्षा साळुंके, सविताताई रायबोले, सुवर्णा धानोरकर, पद्मा धारवडकर, प्रतिभा जराड, रितु अग्रवाल, गीता आचार्य, जान्हवी पाटील, रंजना राठोड, संगीता राऊत, संध्या कापसे, भाग्यश्री ठोसर, लता मुठे, उषा आगलावे, वर्षा जैन, मंगला वाघ, सुवर्ण तुपे, माणिक दौड, कावेरी पावसे, संगीत मोगल, जयश्री दाभाडे, कमल पालवे, मनोरमा ताई, कल्पना त्रिभुवन, रोहिनी खैरे, ज्योती जाधव, शारदा लुटे, लक्ष्मी गायकवाड, पुनम खंडारे, बबीत शिंदे, गौरी पांडे, रंजना वर्मासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here