Home औरंगाबाद भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना औरंगाबादेत पोलिसांनी घेतले ताब्यात

भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांना औरंगाबादेत पोलिसांनी घेतले ताब्यात

111
0

औरंगाबाद : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर या अटकेचे पडसाद राज्यासह देशभरात उमटत आहेत. हा लोकशाहीवरील व चौथ्या स्तंभावरील हल्ला असल्याचे म्हणत भाजपतर्फे ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरु आहेत. औरंगाबादेतील क्रांती चौकात अर्णव गोस्वामीच्या अटकेच्या निषेर्धार्थ शहर भाजपच्या वतीने जोरदार आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
यामध्ये आमदार अतुल सावे, संजय केणेकर, समीर राजूरकर, राजेश मेहता,मनोज पांगारकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बुधुवारी [आज ] पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले तेथून गोस्वामी यांना अटक केली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिले नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळे कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here