Marathwada Sathi

६००० ग्रामपंचायतींमध्ये भाजप नं – १

१४ हजार पैकी ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल – केवश उपाध्ये

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले व यामध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. सत्ताधारी पक्षांनी साम,दाम,दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत. १४ हजार पैकी ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल, असा विश्वास भाजपा प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी आज पत्रकारपरिषदेत व्यक्त केला.

यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, ज्या पद्धतीचे आकडे आपल्या समोर येत आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याविरोधात भाजपा अशीच बहुतांश ठिकाणी लढत झाली आहे. सत्ताधारी पक्षांनी साम,दाम,दंड अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला. पण तरी देखील भाजपाची विजयी घौडदोड ते रोखू शकले नाहीत, हे वास्तव आहे.अनेक ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू आहे. परंतु, आता हाती येत असलेल्या आकडेवारीनुसार भाजपा १४ हजार पैकी सहा हजार ग्रामपंचायतींमध्ये नंबर १ असेल हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून भाजपा नंबर एकचा पक्ष असेल.

Exit mobile version