Marathwada Sathi

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांचे मुख्यामंत्र्यांना आव्हान

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : कमला मिलमध्ये पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झालेल्या घटनेतील १२ आरोपींपैकी प्रथमदर्शनी जे मूळ गुन्हेगार दिसत होते तेच दोन्ही मिल मालक आरोप मुक्त झाले आहेत. त्यामुळे अन्य गुन्हेगारांचे सुटण्याचे मार्ग तर खुले होत नाही ना? पोलीस, महापालिका आणि शासनाने न्यायालयात सक्षमपणे बाजू न मांडल्यास अन्य गुन्हेगारदेखील असेच आरोपमुक्त होणार का?, असे सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केले. तसंच सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात सरकारने आव्हान द्यावं अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्रदेखील पाठवले आहे.

२९ डिसेंबर २०१७‘ रोजी कमला मिल कंपाउंड मधील “वन अबव्ह क्लब” आणि “मोजोस बिस्ट्रो” यांना आग लागून १४ निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२ जणांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल केले होते. यातील कंमला मिल कंमाऊडचे दोन मालक रमेश गोवानी व रवी भंडारी यांनी आरोप मुक्तीसाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता.न्यायालयात झालेल्या दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर दोन्ही मालकांचे अर्ज मान्य करीत त्यांना आरोप मुक्त केले, याची तुम्हाला कल्पना आहे,” असे शेलार यांनी पत्रात लिहिले आहे.

Exit mobile version