Home मुंबई भाजप नेत्याने केले सिबीआय संबंधित हे वक्तव्य…!

भाजप नेत्याने केले सिबीआय संबंधित हे वक्तव्य…!

885
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये यावर्षी निवडणुका होणार आहेत. याच मुद्द्यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे नेते टीव्हीवरील एका शो मध्ये आमने-सामने आले. या शोमध्ये नेतेमंडळीना बोलवण्यात आले होते.कार्यक्रमादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यावर गोवंश तस्करीच्या प्रकरणात सीबीआयने कारवाई केली. या कारवाईबाबत तृणमूलचे नेते विनय गुप्ता यांनी भाजपा सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला.या मुद्द्यांवरून भाजपाचे प्रवक्ते जफर इस्लाम यांनी विवेक गुप्तांना चांगलेच ऐकवले.“सीबीआय ही एक स्वायत्त संस्था आहे. मला या संस्थेचा आदर आहे. पण कधीकधी मला असा संशय येतो की या संस्थांना राजकीय चावी लावली जाते आहे”,असे तृणमूलचे गुप्ता म्हणाले.

विनय गुप्ता यांना प्रतिउत्तर देत इस्लाम म्हणाले की,“बंगालमध्ये काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते परप्रांतीय आणि तृणमूलचे कार्यकर्ते भूमिपुत्र अशी एक नवी संकल्पना मांडली जात आहे. पण तृणमूल काँग्रेसने आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जाण्याचे दिवस आले. जाताजाता एक चांगले काम करून जा.आणि प्रश्न राहिला सीबीआयचा तर सीबीआय ही स्वतंत्र संस्था आहे. ते त्यांचे काम योग्यप्रकारे करतीलचा.’आता सगळ्यांना पवित्र व्हावे लागेल आणि ते काम सीबीआयच करेल”,असे मोठे वक्तव्य यावेळी जफर इस्लाम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here