परळी वैजनाथ :सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. नव्या वादात अडकले आहेत. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केला आहे. त्यामुळे मुंडे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी संबंधित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे भाजपने धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी सविस्तर खुलासा करत सहमतीने संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तर किरीट सोमय्या यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “धनजंय मुंडे यांनी स्वत: त्यांना दोन पत्नी आहेत, असे मान्य केलं आहे. त्यात आता तिसरी महिला त्यांच्यावर आरोप करतेय, त्यामुळे जोपर्यंत धनंजय मुंडे या प्रकरणातून मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.