Home Uncategorized पैठणमध्येही घुमला भाजपचा आवाज….. “मदिरा सुरु तर मंदिर बंद “च्या घोषणा देत...

पैठणमध्येही घुमला भाजपचा आवाज….. “मदिरा सुरु तर मंदिर बंद “च्या घोषणा देत भाजपचे सरकारविरोधात आंदोलन

0

पैठण- महाराष्ट्र सरकारने बियरबार उघडे आणि मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, पैठण येथे भाजपच्या वतीने संत एकनाथ महाराज समाधी मंदिरासमोर आज आंदोलन करण्यात आले.
मंदिरे बंद ,उघडले बियरबार: उद्धवा धुंद तुझे सरकार
असे म्हणत पैठण भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. राज्यातील मंदिरे तातडीने उघडावी या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरासमोर व अनेक धार्मिक संघटना एकत्र करून भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय अवताडे, महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्याण नाना गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष डॉ. सुनील शिंदे व शहर अध्यक्ष श्री शेखर पाटील यांनी केले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी टाळमृदंग वाजवुन व भजन भारुडे म्हणत शासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
या आंदोलनासाठी भाजप सरचिटणीस लक्ष्मण औटेजिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे सह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here