Marathwada Sathi

ठाण्यातील ३५३ पक्ष्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू…!

मराठवाडा साथी न्यूज

ठाणे : कोरोनानंतर आता देशावर बर्ड फ्लूचे संकट आले आहे.मागील १५ दिवसात ठाण्यामध्ये ३५० पेक्षा अधिक पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.फक्त शुक्रवारी (१५ जाने.)एका दिवसात तब्ब्ल ३५ पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आहे आहे.यामध्ये कावळा प्रजातीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

ठाण्यातील पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने पाणबगळ्यांचे मृतदेह पुण्यातीळ एका लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले असता काही बगळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले.त्यानंतर प्रशासनाने पालिकेतच बर्ड फ्लू नियंत्रक कक्ष स्थापन करुन नागरिकांनी पक्षी मृत सापडल्यास पालिकेला कळवावे असे जाहीर आवाहन केले.

दरम्यान,ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यात आतापर्यंत तब्बल ३५३ पक्षांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे.ठाण्यामध्ये पाहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी मृत पावलेले आहेत. त्यामुळे बर्ड फ्लू मोठ्या प्रमाणात ठाण्यात वाढतच चालेले हे स्पष्ट झाले आहे.मृत पक्षांमध्ये मुक्त संचार करणारे पक्षी असल्यामुळे पाळीव पक्ष्यांमध्ये अजून या रोगाचे संक्रमण झाल नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे ज्यांच्याकडे पाळीव पक्षी आहेत अश्या नागरिकांनी घाबरु नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version