Marathwada Sathi

देशावर अजून एक ‘संकट’…!

मराठवाडा साथी न्यूज

अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : कोरोना चे संकट अजूनही टळले नाही आणि त्यातच आता देशावर अजून एक संकट आले आहे.कोरोनानंतर आता हिमाचल प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’ चे संकट आले आहे.बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.हिमालच प्रदेशात असणाऱ्या कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुळे हे संकट नव्याने आल्याचे चिन्ह दिसून येत आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी(४ जाने.)१७० हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे.

पशुपालन विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार ४२५ हून जास्त पक्ष्यांचा मृत्यूमुखी पडले आहेत.झालावाडमधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली.

दरम्यान,फतेहपूर,देहरा,जवाली,इंदैरा या भागांत कोंबडी, बदक,मासे या प्रजातींपासून मिळणारी उत्पादने,अंडी, मांस या साऱ्याच्या विक्रीवर कांगडा येथी जिल्हाधिकारी राकेश प्रजापती यांनी बंदी घातली आहे.

Exit mobile version