Home अर्थकारण सट्टेबाजीतून मिळू शकतो कोट्यावधींचा महसूल – अनुराग ठाकूर

सट्टेबाजीतून मिळू शकतो कोट्यावधींचा महसूल – अनुराग ठाकूर

35
0

भारतात सट्टेबाजीला अधिकृत मान्यता मिळू शकते, असे संकेत केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले आहेत. सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसून अर्थव्यवस्थेला त्याचा हातभार लागेल असे मत अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटी तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जुगार किंवा सट्टेबाजीला अधिकृत मान्यता मिळाली अशी सूचना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अर्धवेळ सदस्य असलेल्या निलेश शहा यांनी या कार्यक्रमात केली . त्यावर अनुराग ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली . ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये सट्टेबाजीला अधिकृत मान्यता आहे यामुळे आर्थिक फायदा मिळतो तोच भारतात याला मान्यता मिळाली तर भारताला आर्थिक फायदा मिळू शकतो. असे संकेत अनुराग ठाकूर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here