Home क्राइम बिहार : मतमोजणीपूर्वीच भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या

बिहार : मतमोजणीपूर्वीच भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या

820
0

रस्त्यात अडवून हल्लेखोरांनी केला गोळीबार

मराठवाडा साथी ऑनलाईन

बिहारच्या भोजपुर जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या पूर्वीच भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीवर गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रीतम नारायण सिंह असे हत्या झालेल्या भाजपा नेत्याच्या पतीचे नाव आहे. ते व्यवसायाने वकील होते. सुंदरनगर परिसरामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी न्यायालयासमोर प्रीतम यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला. प्रीतम यांच्या पत्नी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्या स्थानिक राजकारणामध्ये सक्रीय आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्या प्रचारार्थ अग्रणी होत्या. प्रचारापासून ते सभेपर्यंत महिलांना सहभागी करण्यात त्या पुढे होत्या.
घटनेची माहिती मिळताच भोजपूर पोलीस अधिक्षक किशोर राय यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्रीतम यांच्या मुलाने सांगितले कि, वडील प्रतिमा हे दुचाकीने घराकडे निघाले होते. सुंदरनगर परिसरात एका मंदिराजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. त्यांची चौकशी करु लागले. प्रीतम हे त्यांच्याशी बोलत असतानाच अचानक प्रीतम यांच्यावर त्या दोघांनी गोळीबार केला. या हल्ल्यात प्रीतम यांना एक डोक्यात तर दुसरी गोळी पाठीत लागली. प्रीतम आणि त्यांच्या भावाचा मागील एका वर्षापासून जमिनीच्या वाटपावरुन वाद सुरु असल्याची माहिती प्रीतम यांचा मुलगा प्रियदर्शी याने दिली. मात्र प्रीतम यांच्यावर गोळीबार कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. सध्याप्रीतम यांच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. चौकशीसाठी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here