Marathwada Sathi

‘IPLच्या इतिहासातील सर्वात मोठा फ्रॉड..’ SRH च्या १३.२५ कोटींच्या खेळाडूवर चाहते भडकले

लखनऊ: लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यातील सामना शुक्रवारी लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादच्या संघाचे अनेक खेळाडू संघात परतले. त्यामुले संघाला आदिक बाळ येईल आणि हा समान ते जिंकत आपला पहिला विजय मिळतील असे वाटत होते. पण तसे झाले नाही, हैदराबादच्या संघाला मात्र ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यात एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या निर्णयाचा त्यांच्यावर उलटाच परिणाम झाला आहे. त्याचवेळी संघातील सर्वात महागडा खेळाडू पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला आहे. आता चाहते मात्र सोशल मीडियावर चांगलीच फिरकी घेत आहेत.

https://twitter.com/babarazamking_/status/1644355027639717888?s=20
https://twitter.com/kritiitweets/status/1644352776586276864?s=20
https://twitter.com/IconicKohIi/status/1644351618849345537?s=20

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा हैदराबादचा संघाची फलंदाजी बाजू गोंधळताना दिसली. सनरायझर्स हैदराबादचा स्टार स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकही आयपीएल २०२३ मध्ये अपयशी ठरला आहे. या मॅचमध्ये हॅरीने ४ चेंडूत ३ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, १३.२५ कोटी रुपयांमध्ये SRH चा भाग असलेल्या हॅरी ब्रूकची बॅट अजूनही शांतच आहे. यापूर्वी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २१ चेंडूंत केवळ १३ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, या दोन्ही सामन्यांमध्ये हॅरी चांगलाच फ्लॉप ठरला आहे. त्याच्या या फ्लॉप शोवर सोशल मीडियावर SRH च्या चाहत्यांनी एकच गोंधळ घातला आहे.

हैदराबाद संघाचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी, संघाने २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान अनमोलप्रीतने ३१, त्रिपाठीने ३५ धावा केल्या आणि अखेरीस अब्दुल समदने १० चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे, लखनऊच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, कृणाल पांड्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत आणि अमित मिश्राच्या खात्यात २ विकेट्स आहेत. याशिवाय यश ठाकूर आणि रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

Exit mobile version