Home महाराष्ट्र मोठी बातमी ! पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवला

मोठी बातमी ! पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवला

11642
0

ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी पहिल्या टप्प्यात सुरू होतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मुंबई :  राज्यात कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध आता हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि तेथील ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल त्या जिल्ह्यात सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु
रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील.
खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील. चित्रपट शूटिंगला परवानगी, थिएटर सुरू होतील. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे.
ई कॉमर्स सुरू राहिल.
जिम, सलून सुरू राहणार.
पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.
बस 100 टक्के क्षमतेने धावणार.
आंतरजिल्हा प्रवासला मुभा राहिल.
इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील.

दुसऱ्या टप्यातील जिल्ह्यात काय?

50 टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू
मॉल्स, थिएटर्स 50 टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही.
सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील.
बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण सुरू राहणार.
ई सेवा पूर्णपणे सुरू.
जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरू
बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने
जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र, पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल.

तिसऱ्या टप्यातल्या जिल्ह्यात काय?
अत्यावश्यक दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत 
इतर दुकाने  सोमवार ते शुक्रवार 7 ते 2  ( शनिवार रविवार बंद)

हे आहेत पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ

दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार

तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 

चौथ्या टप्प्यातील 2 जिल्हे
पुणे, रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here