Marathwada Sathi

भाजपाला मोठा धक्का….


मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : शिवसेना आज भाजपाला मोठा धक्का देणार आहे. नाशिकमधील दोन नेते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे कळते. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर होते. तर बागूल हे जिल्हा प्रमुख होते. मात्र, सध्या भाजपामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून कळते. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली आहे .

Exit mobile version