Home इतर बजाज ऑटो ची मोठी घोषणा कामगारांना मोठा दिलासा…!

बजाज ऑटो ची मोठी घोषणा कामगारांना मोठा दिलासा…!

111
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : देशाच्या दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज ऑटो महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. बजाज ऑटो पुण्यातील चाकणमध्ये हा कारखाना उभारणार असून या नवीन कारखान्यातून २०२३ पर्यंत उत्पादन घेण्यास सुरूवात होईल, अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त केली. “ही गुंतवणूक म्हणजे ज्या राज्यातून आमच्या प्रवासाची सुरूवात झाली त्या राज्याशी आम्हाला असलेली बांधिलकी आहे, आणि कंपनीचा ७५ वा वर्धापन दिन साजरा होत असलेल्याच वर्षी ही गुंतवणूक झाली” असं कंपनीने एका प्रेस नोटमधून सांगितलं.या कारखान्यात मोटरसायकल्स तयार होतील.याशिवाय नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटरपासून सुरू होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मॅन्युफॅक्चरिंगही याच कारखान्यात होईल.

दरम्यान, बजाज ऑटोची एकूण विक्री यावर्षी नोव्हेंबरमध्ये टक्क्यांनी वाढून ४,२२,२४० युनिटवर पोहोचली. नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीने ४,०३,२२३ वाहनांची विक्री केली होती. करोनामुळे अर्थचक्र मंदावले. मात्र, टाळेबंदी शिथिल करून त्यास गती देतानाच राज्य सरकारने वर्षभरात विविध उद्योगांशी एकूण दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे करार केले. त्यात मंगळवारी २५ करारांचा समावेश झाला. या नव्या करारांद्वारे सुमारे ६१ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, अडीच लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here