Marathwada Sathi

जाचक अटींमुळे लाभार्थी हैराण; पी एम ए वाय योजनेतील लाभार्थ्यांची हरेसमेंट सचिन पवार ।

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । पी एम ए वायच्या लाभार्थ्यांना शहरातील बांधकामासाठी महानगर पालिकेची परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळवण्याकरिता लाभार्थ्याची दमछाक होते. यानंतरही असलेल्या काही नियम आणि अटींमुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी लाभ घेईनात, अशी योजनेची स्थिती आहे.
शासन देशभरात घरकुल योजनेअंतर्गत मोठ्याप्रमाणावर घरे उभारण्याचे सांगते. परंतु शहर हद्दीत या योजनेअंतर्गत स्वतःच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या लाभा सोबतच जाचक अटी व नियम देखील घातले आहेत. त्यामुळे लाभार्थी अक्षरशा त्रासले आहेत. स्वतःच्या जागेवर बांधकाम करण्याकरिता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मनपाची बांधकाम परवानगी आवश्यक आहे. ही परवानगी मिळवण्यासाठी लाभार्थ्याला चांगलीच कसरत करावी लागते. यात लाभार्थ्यांची अक्षरश: मानसिक छळ होतो आहे.
आर्थिक लूट
बरेच लाभार्थी प्रथमच महापालिकेचा उमरा ओलांडत असतात. तिथे गेल्यानंतर अधिकाऱ्यांचे तोऱ्यात वागणे त्यामुळे लाभार्थी इंजिनियरला हवे तेवढे पैसे मोजून त्यांच्यामार्फतच संचिका पाठवणे पसंत करतो. याठिकाणी लाभार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याची आर्थिक लूट केली जाते. प्रत्येक गोष्टी करिता अधिकचे पैसे लाभार्थ्याला मोजावे लागतात. यात केवळ प्लॅन तयार करण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतात.
३०० स्क्वेअर फुटामध्ये १२ फूट सोडून करायचे बांधकाम
अनेक हेलपाटे घातल्यानंतर मोठ्या अडचणी चा सामना केल्यानंतर ही बांधकाम परवानगी मिळते. परंतु यातही तीनशे स्केअर फुट बांधकामाला मंजुरी देताना भौगोलिक परिस्थिती पाहून किमान समोरच्या भागातून पाच फूट पाठीमागून देखील पाच ते सात फूट जागा सोडण्याचा नियम आहे. हा नियम कानी पडल्यानंतर अनेक जण योजनांचा लाभ घेणे टाळतात.

Exit mobile version