Marathwada Sathi

घरकुलासाठी अर्ज न दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी नव्याने अर्ज करावेत – गजानन कदम





बीड
शहरात नव्याने प्रधानमंत्री आवास योजना घरकुल अर्ज दाखल करणे सुरू असून जे पात्र आहेत पण अर्ज दाखला करू शकले नाहीत अशांनी नव्याने अर्ज दाखल करावेत असे आवाहन जी.के सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गजानन कदम यांनी केले आहे.
बीड नगर परिषदेस प्रधानमंत्री आवास योजनेचा बीड शहरात ज्या लाभार्थ्यांनी आणखी सुद्धा लाभ घेतलेला नाही किंवा अर्ज दाखल केलेला नाही अशा लाभार्थ्यांकरिता नव्याने अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे तरी बीड शहरातील नागरिकांना सुचित करण्यात येते की स्वतःच्या जागेत पक्के घर बांधण्याकरिता नगर परिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना कक्षाकडे अर्ज सादर करावेत त्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज दाखल करावेत असे आवाहन जी.के सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गजानन कदम यांनी केली आहे घरकुलाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
1) बीड नगर परिषद पी टी आर
2)जागेचे खरेदीखत
3) पी आर कार्ड किंवा
सातबारा 7/ 12
4 ) घरातील सर्व सभासदांचे आधार कार्ड
5 ) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक नगरपालिकेत आवास योजनेच्या विभागात सादर करावेत

Exit mobile version