Marathwada Sathi

Beed DCC Bank Election; विरोधकांत “दम” नाही!

ना.धनंजय मुंडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

दत्तात्रय काळे l परळी
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदान प्रक्रिया सुरू आहे. आज दि.20 मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. परळी वैजनाथ येथील औद्योगिक वसाहत मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी दुपारच्या सुमारास मतदान केले.
मतदानाच्या नंतर केंद्राच्या बाहेर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की, मागील काळात बीड बँक ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी ती कशी लुटली आणि कशी डबघाईला आणली हे सर्वश्रुत आहे. विरोधकांनी ऐन वेळी माघार घेऊन आमच्यावर पळपुटेपणाचा जो आरोप लावला आहे तो त्यांनाच लागू होतो. 2018 च्या मतदार यादीवरच आजची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यांच्या सत्तेच्या काळातीलच मतदार यादी आहे म्हणजे सर्वाधिक त्यांनाच मानणारा मतदार वर्ग आहे. असे असतांना ते माघार घेत आहेत म्हणजे ते स्वतःच पळपुटे आहेत, त्यांच्यात निवडणुका लढवण्याची धमक नाही, त्यांच्यात आता दम उरलेला नाही. विरोधकांनी आत्मविश्वास गमावल्यानेच त्यांनी माघार घेतली असल्याचा घणाघात ना.धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. दुपारी 2 वाजेपर्यंत वैध असलेल्या 117 मतांपैकी 48 मतदान झाले होते.

Exit mobile version