Marathwada Sathi

‘बिअर्ड’ मुळे होऊ शकतो ‘कोरोना’…?

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : सध्या तरुणांमध्ये बिअर्ड ची क्रेज वाढतच चालली आहे.त्या मध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या बिअर्ड लूक ठेवण्याचा ट्रेंड सध्या सर्वत्र सुरु आहे.पण याच दाढी (beard) आणि मिशांमुळे‘कोरोना व्हायरस’च्या संपर्कात येण्याची दाट शक्यता असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने ‘इंफोग्राफिक्स’ जारी केले आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणातील दाढी ‘फेस मास्क’चा प्रभाव कसा कमी करते,यासाठी एक चार्ट जारी करण्यात आला आहे. हा चार्ट २०१७ चा असून, कोरोना व्हायरसच्या काळात पुन्हा एकदा हा चार्ज प्रसारित करण्यात आला आहे.सीडीसीने या संदर्भात १२ स्टाइल सुचवल्या आहेत. यात क्लिन शेव, सोल पॅट्च, साइड व्हिस्कर्स, पेन्सिल अशा स्टाईलचा समावेश आहे.

दाढीचे केस दाट नसतात व बारीक कणांना रोखू शकत नाहीत. चेहऱ्यावर केस असल्याने मास्क लीकेजचे प्रमाण २० वरून १००० पट अधिक वाढते. त्यामुळे आपण अशा परिस्थिती घनदाट दाढी (beard) ठेवणे टाळायला हवे.

Exit mobile version