Home आरोग्य CoronaNewsUpdate : सावधान !! येत्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये ...

CoronaNewsUpdate : सावधान !! येत्या दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ

4942
0

नवी दिल्ली : येत्या दोन आठवड्यांत जागतिक स्तरावर दररोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होईल. अमेरिकन टेलिव्हिजन चॅनेल एनबीसीच्या ‘मीट द प्रेस शो’मध्ये मिनेसोटाच्या सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिसिज रिसर्च अँड पॉलिसीचे संचालक मायकेल ऑस्टरहोलम म्हणाले की, जागतिक स्तरावर कोरोना विषाणूचा धोका पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. एका अमेरिकी संसर्गजन्य रोग तज्ञांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.

या शो मध्ये बोलताना मायकेल म्हणाले, येणाऱ्या काळात संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या मोठी वाढ होईल आणि कोरोनाचा प्रसार झाल्यापासूनची ही सर्वाधिक रुग्णसंख्या असेल. ते म्हणाले, की माझ्या मते सध्या संपूर्ण जग कोरोना संसर्गाच्या प्रकरणात पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळाचा सामना करत आहे. पुढच्या दोन आठवड्या आपल्याला असं जाणवेल, की कोरोनाचे रोज समोर येणारे रुग्ण आजाराच्या प्रसारापासूनचे सर्वाधिक रुग्ण असतील. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या डिसेंबर 2020 मध्ये आढळून आली होती. लसीकरण सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत बरीच घट झाली. मात्र, भारत, अमेरिका, ब्राझील, इटली आणि जर्मनीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा मोठं संकट उभं ठाकलं आहे.

अमेरिकी आरोग्य विशेषतज्ञ म्हणाले, की अमेरिकेबद्दल बोलायचं झाल्यास, आता केवळ रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे, मात्र पुढे ही संख्या आणखी वेगाने वाढणार आहे. चिंताजनक बाब म्हणजेच भारतात शुक्रवारी इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. टक्केवारीनुसार पाहिल्यास भारतात अमेरिकेपेक्षाही अधिक रुग्णसंख्या आढळत आहे. मागील 50 दिवसात कोरोना रुग्णसंख्येत दहा पटीनं वाढ झाली आहे. हे आकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केले आहेत. जागतिक स्तरावर मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक नोंदवली गेली होती.

जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या कोरोना वायरस रिसोर्स सेंटरच्या म्हणण्यानुसार, जगभरातून आतापर्यंत 13 कोटीहून अधिक कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर, 28.4 लाखाहून अधिक लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here