Marathwada Sathi

BCCI चा पाकिस्तानला दणका! आशिया कपचं यजमानपद …

मुंबई : भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे. आशिया कप 2023 बाबत मोठी बातमी समोर येत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार नाही.
आशिया कप 2023 संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा कतार येथे आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. आशिया कपचं यजमानपद यावेळी पाकिस्तानकडे होतं. मात्र पाकिस्तानमधील एकूण स्थिती पाहता ते काढून घेण्यात आलं आहे.
आशिया चषक 2023 कुठे आयोजित केला जाईल याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पाकिस्तान आशिया कप 2023 चे आयोजन करणार नाही हे निश्चित झाल्याने पाकिस्तानला हा खूप मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
सूर्यकुमार करणार मुंबई इंडियन्सचे नेतृत्व? काही सामन्यात रोहित संघातून बाहेर बसण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव अजूनही कायम आहे. बीसीसीआय पाकिस्तानात योग्य सुरक्षेची व्यवस्था नाही यावर ठाम आहे. यामुळे टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही असं BCCI ने सांगितलं.
टीम इंडिया जर आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर आमची टीम आशिया कप खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. त्याचमुळे आशिया कप आता UAE मध्ये होऊ शकतो अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे.

Exit mobile version