Marathwada Sathi

१ डिसेंबरपासून बदलताय बॅंकींगचे ‘नियम’

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : यावर्षी कोरोनामुळे सर्वच काही बदलत चाललं आहे.यात बँकिंग सेक्टर मधेही आता बदल होतांना दिसत आहेत. ‘रिझर्व बॅंक ऑफ इंडीया’ ने रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट मधील नियमांमध्ये बदल केलाय. ज्यामुळे १ डिसेंबर २०२० पासून कॅश ट्रान्सफर संदर्भातील काही नियम बदलणार आहेत. यामध्ये सर्वात मोठा बदल ‘रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट’ संदर्भातील आहे.

नवीन नियमांनुसार आता २४ तास ‘रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट’ सुविधेचा फायदा घेता येणार आहे. RBI ने हा नियम १ डिसेंबरपासून लागू करायचे ठरवले आहे. आत्तापर्यंत आरटीजीएस सिस्टीम महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी स.७ वाजल्यापासून ते संध्या.६ पर्यंत उपलब्ध होती. पण आता सातही दिवस या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मोठे व्यवहार करणे,मोठे फंड ट्रान्सफर करणे हे डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Exit mobile version