Home देश-विदेश आता लद्दाखमध्ये भारतीयांना खरेदी करता येणार नाही जमीन

आता लद्दाखमध्ये भारतीयांना खरेदी करता येणार नाही जमीन

71
0

नवी दिल्ली । मंगळवारी केंद्सर रकारने लॅन्ड लॉ ऑफ जम्मू काश्मीरमध्ये मोठा बदल केला आहे. त्यासंदर्भात सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आले आहे. या निवेदनानुसार लद्दाखमध्ये जमिनी खरेदीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही भारतीय व्यक्तीला लद्दाखमध्ये जमीन खरेदी करू शकणार नाही.
गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा त्वरीत लागू होतो. परंतु लद्दाखमध्ये सध्या हा लागू केल्याचे दिसत नाही. यामागे लदाखचे नेते आणि सरकारमध्ये मागच्या काही महिण्यातील चर्चा महत्त्वाचे कारण मानले जात आहे. या दरम्यान LAC वरील भारत-चीन वाद लक्षात घेता कलम ३७१ च्या अनुशंगाने मागणी केली आहे. कलम ३७१ मध्ये सहा पूर्वीय राज्यासहीत एकूण ११ राज्यांसाठी विशेष तरतूद नमुद आहे. ज्यामुळे त्यांची संस्कृती आणि आर्थिक हिताची रक्षा केली जावू शकेल. लद्दाखच्या नेत्यांनी म्हटले की, त्यांची ९० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे, त्यामुळे त्यांच्या अधिकारांची रक्षा करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here