Home औरंगाबाद बहुजन समाज पार्टी तर्फे ‘मराठवाडा विभागीय संघटन’ कार्यक्रम हॉटेल हेरिटेज पॅलेस येथे...

बहुजन समाज पार्टी तर्फे ‘मराठवाडा विभागीय संघटन’ कार्यक्रम हॉटेल हेरिटेज पॅलेस येथे संपन्न

317
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : बहुजन समाज पार्टी तर्फे ९ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागीय संघटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अँड.खा.वीरसिंग {राष्ट्रीय महासचिव},मा. प्रमोद रैना {प्रदेश प्रभारी},अँड. संदीप ताजने {प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र} हे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक उपस्थित होते. दरम्यान पंडित बोर्डे,प्रशांत खिल्लारे, संजय वाघमारे डिगंबर ढोले,निवृत्ती बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलतांना खा.वीरसिंग म्हणाले ‘आम्ही सर्व कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार असून या देशात त्यांच्या विचारांचा भारत निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरून संघटन बांधणीच्या कामाला लागावे.’

या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह मराठवाड्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी केले.दरम्यान,मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here