Marathwada Sathi

बबिता फोगट ने शेअर केली ‘गुड न्यूज’

मराठवाडा साथी न्यूज

भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट लवकरच ‘आई’ होणार आहे. हि गुड न्यूज तिने तिच्या सोशल मीडिया अकांउंटवर बेबी बंपसह पती विवेक सुहाग बरोबरचा एक फोटो शेअर करत दिली आहे. बबिताने विवेकबरोबर शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘तुझी पत्नी म्हणून तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणी मला वाटले की मी भाग्यवान आहे. तू माझ्यासाठी माझी आनंदाची जागा आहे. तू मला पूर्ण केले आहेस. माझ्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरु होण्याची वाट पाहात आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे.’

१ डिसेंबर २०१९ ला बबिता कुस्तीपटू असणाऱ्या विवेकबरोबर विवाहबद्ध झाली होती.बबीताने भारताकडून २००९ आणि २०११ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

https://www.instagram.com/p/CH2eztlnfBw/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version